मुस्लिम ब्रदरहूडच्या १८८ समर्थकांना मृत्यूदंडाची शिक्षा!

muslim-brotherhood
काहिरा – २०१३ साली मुस्लिम ब्रदरहूड पक्षाच्या समर्थकांनी मिस्त्रची राजधानी काहिरामध्ये एका पोलिस स्थानकावर हल्ला केला होता. मुस्लिम ब्रदरहूडच्या जवळपास १८८ पेक्षा अधिक समर्थकांना या हल्ल्याच्या आरोपाखाली मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली आहे.

राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांच्या समर्थकांच्या तंबुवर सुरक्षा बलाच्या जवानांनी हल्ला चढवत त्याची मोडतोड केली होती. त्या हल्ल्यात मोर्सींचे शेकडो समर्थक मारले गेले होते. याला प्रत्युत्तर म्हणून समर्थकांनी एका पोलिस स्टेशनवर हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलिस दलाच्या ११ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांच्याविरोधात मिस्त्रमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. त्यानंतर मुबारक यांच्या जागी मोहम्मद मोर्सी यांची नेमणूक करण्यात आली. ज्या १८८ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यापैकी १४० हून अधिक लोक पोलिसांच्या ताब्यात आहेत. बाकीचे आरोपी पोलिसांच्या निरीक्षणाखाली आहेत. याशिक्षेची अंतिम सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे. त्यानंतर हे आरोपी या निर्णयाविरोधात मिस्त्रच्या सर्वेच्च धार्मिक न्यायालयात दाद मागू शकतात.

Leave a Comment