सॅमसंगचा गॅलेक्सी ए सेव्हन लवकरच

galaxy
गॅलेक्सी ए सिरीज डिव्हायसेसमधील लेटेस्ट स्मार्टफोन ए सेव्हन सॅमसंग लवकरच बाजारात आणत असल्याचे वृत्त आहे. गॅलेक्सी ए ५ ची यापूर्वीच चीनमध्ये विक्री सुरू करण्यात आली असून त्यांचा लो एंड ए थ्री ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून दिला गेला आहे.

ए पाच व ए सेव्हन हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होत असून ए सेव्हनसाठी ४.४ अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. अमोल्ड पॅनल,५.२ इंची स्क्रीन, ५ एमपीचा फ़्रट तर १२ एमपीचा रियर कॅमेरा, १६ जीबी इंटरनल मेमरी, फोर जी एलटीइ कनेक्टिव्हीटी अशी या स्मार्टफोनची अन्य फिचर्स आहेत.

Leave a Comment