चीनची विवो मोबाईल कंपनी भारतात हँडसेट बनविणार

vivo
पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केलेल्या मेक इन इंडिया घोषणेची दृष्य फळे दिसू लागली आहेत. चीनची नंबर १ ची स्मार्टफोन मेकर कंपनी विवोने भारतात त्यांच्या मोबाईल हँडसेट उत्पादन प्रकल्पाची घोषणा केली असून तीन वर्षांच्या आतच हे उत्पादन केंद्र सुरू केले जाणार असल्याचे सांगितले आहे.

भारताने मेक इन इंडिया मोहिमेसाठी चीन, जपान आणि दक्षिण कोरियावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या देशातील कंपन्यांनी इलेक्ट्रोनिक्स उत्पादनांसाठी भारतात यावे यासाठी मुद्दाम प्रयत्न केले जात आहेत. विवोचे संचालक जॅक लियाओ यांनी त्यांची कंपनी हँडसेट उत्पादनासाठी भारतात गुंतवणूक करण्याच्या प्रयत्नात असल्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की भारतात स्मार्टफोनला मागणी खूप आहे आणि येथे बाजारपेठही मोठी आहे. त्यामुळे आम्ही येथेच आमचा उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहोत. कंपनी त्यांच्या एक्स फाइव्ह सह अन्य ४-५ स्मार्टफोन मॉडेल्स भारतात लाँच करत आहे.

एक्स फाईव्ह चीननंतर भारतातच लाँच केला जात आहे. विवो चीनच्या बाजारातील सर्वात मोठी कंपनी असून तिचा चीनी बाजारपेठेतील हिस्सा ८ टक्के इतका आहे. दर महिन्याला कंपनी चीनमध्ये ३० लाख फोन विकत असून भारतातही २० राज्यात कंपनीने वितरक नेमले आहेत असेही समजते.

Leave a Comment