पुण्यात पुन्हा गँगवॉर; एकाची गोळ्या घालून हत्या

ganwar
पुणे – पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉर पाहायला मिळाले असून घायवळ आणि मारणे टोळीमध्ये झालेल्या हल्ल्यात मारणे टोळीच्या सात-आठ गुंडांनी अमोल हरी बढे याची गोळ्या झाडून हत्या केली. तर बढेसोबत असलेले मित्र दीपक बाबूराव लोखंडे आणि संतोष नागू कांबळे हे दोघे जखमी झाले आहेत.

तिघेही एका दुचाकीवरून काल चारच्या सुमारास जात होते. त्यावेळी मारणे टोळीच्या सात-आठ जणांनी आनंदबाग सोसायटीजवळ अचानक हल्ला केला. हे हल्लेखोर तीन दुचाकी आणि एका चारचाकी गाडीतून आले होते. त्यांच्यापैकी एकानं बढे याच्यावर चार गोळ्या झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अमोल बढेचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले. याप्रकरणी गजा मारणेसह सहा जणांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment