२६ हजाराच्या खाली आले सोने!

sone
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने सोन्याच्या आयातीवरील निर्बंध शिथील केल्यामुळे आता सोन्याच्या किंमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी तर ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

सोने आयातीवरील ८०:२०ची नियमावली भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केली आहे. आधीच मागणी घटत असल्याने सलग चौथ्या दिवशी सोन्याचा भाव २५ हजार सातशे ९४ रुपयांवर येऊन ठेपला आहे. जागतिक बाजारातही सोन्याच्या घसरणीचा कल कायम राहिल्यामुळे आभूषण निर्मात्यांच्या मागणीतही घट झाली आहे. तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाच्या दरातील घसरणीचाही परिणाम जागतिक सराफा बाजारावर झाल्यामुळे सोन्याचे भाव गडगडले आहेत.

Leave a Comment