लिंशॉर्फचा अष्टकोनी स्मार्टफोन आय एट

lindoff
स्मार्टफोनच्या दुनियेत प्रथमच जर्मन कंपनी उतरली असून लिशॉर्फ या कंपनीने त्यांचा पहिलावहिला स्मार्टफोन आणि टॅब्लेट लाँच केला आहे. आय एट नावाने बाजारात आणल्या जात असलेल्या या फोनच्या हँडसेटचा आकार अष्टकोनी असून त्याचा स्क्रीन कॉम्पुटर डेस्क टॉप सारखा आहे. बाजारातील या फोनची किंमत आहे ३८० डॉलर्स म्हणजे २२ हजार रूपये

कंपनीचे सीईओ थॉमस बेनसिक या स्मार्टफोन व टॅब्लेट संदर्भात म्हणाले की, आय ८ केवळ ग्राहकाच्या सर्व गरजा पुरविणारे उपकरण नाही तर ते बिझिनेस टूल म्हणूनही वापरता येणार आहे. पाच इंची डिस्प्ले, ८० जीबी स्टोरेज त्याला देण्यात आले आहे. यातील १६ जीबी अॅप्ससाठी तर ६४ जीबी मल्टीमिडीयासाठी वापरता येणार आहे. अॅड्राईड ५.० लॉलीपॉप ओ एस सिस्टीम त्याला दिली गेली आहे. आमची कंपनी या क्षेत्रात नवीन असली तरी आमच्या या फोनला ग्राहक चांगली पसंती देतील असा विश्वास वाटतो.