राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यावर बहिष्कार

combo
नाशिक: माजी आमदार वसंत गीते आणि त्यांच्या सर्मथकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावर अघोषित बहिष्कार टाकल्यामुळे अद्यापही आपण नाराजच असल्याचे गीतेंनी या बहिष्काराद्वारे दाखवून दिले आहे.

सध्या राज ठाकरे नाशिकमध्ये असून पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. मनसेच्या सरचिटणीसपदाचा वसंत गीते यांनी राजीनामा दिल्यामुळे राज ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

गीतेंच्या राजीनाम्याचा भविष्यात पक्षावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी स्वतः राज यांनी नगरसेवकांपासून थेट सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्यक्ष चर्चा करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे वसंत गीतेंच्या नाराजीचा कोणताही परिणाम या दौऱ्यात झाला नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment