नायजेरियात मशीदीतील स्फोटात १२० ठार

nijeria
नायजेरियातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठ्या ग्रँड मशीदीत शुक्रवारी दुपारी नमाजाच्या वेळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटात किमान १२० जण ठार तर २७० हून अधिक लोक जखमी झाले असल्याचे समजते. स्थानिक वेळेनुसार दुपारी दोनच्या सुमारास हे स्फोट झाले. यावेळी शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक मशीदीत आले होते. कानगो शहरातील ही मशीद नाजरेरियातील प्रमुख मशीद आहे.

देशातील मोठा मुस्लीम नेता या मशीदीचा प्रमुख असून त्याने आठवड्यापूर्वीच बोको हरम बंडखोरांविरोधात शस्त्रे हाती घेण्याचे आवाहन देशातील जनतेला केले होते असे समजते. एका अधिकार्‍याने नांव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार मुख्य मशीदीत पाठोपाठ दोन स्फोट झाले असून हे आत्मघाती हल्ले असावेत असा तर्क आहे. स्फोटानंतर कांही वेळातच १००हून अधिक प्रेते रूग्णालयात आणली गेली तर अन्य तीन रूग्णालयातून जखमींना दाखल करण्यात आले. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment