मेसीने केला सर्वाधिक गोलचा विक्रम

messi
निकोसा – बुधवारी चॅम्पियन लीगच्या स्पर्धेत लिओनेल मेसी यूएफा चॅम्पियन्स लीगच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे. त्याच्या हॅटट्रिकमुळे बार्सिलोनाने अॅपोलचा ४-० ने दणदणीत पराभव केला. हा विक्रम करत त्याने माजी दिग्गज फुटबॉलपटू राउल यांच्या सर्वाधिक ७१ गोलचा विक्रमही मोडला.

मेसीच्या नावावर आतापर्यंत ७४ विक्रमी गोलांची नोंद झाली आहे. या लढतीपूर्वी मेसीचे ७१ गोल होते. रॉल यांनी १४२ सामन्यांमध्ये ७१ गोल केले होते. तर मेसीने केवळ ९१ सामन्यांमध्ये ७४ गोल करण्याचा विक्रम केला आहे.

चारच दिवसांपूर्वी मेसीने ला लिगा स्पर्धेच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला होता. ला लिगा स्पर्धेत १९५५ पासून अबाधित असलेला टेल्मो झारा यांचा २५१ गोलांचा विक्रम मोडत त्याने नवा २५३ गोल करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला.

Leave a Comment