पेट्रोल आणि डिझेल २ रुपयांनी स्वस्त होणार?

petrol
नवी दिल्ली – येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २ रुपयांची कपात होण्याची शक्यता असून ह्या नव्या किंमती ३० नोव्हेंबरपासून लागू होऊ शकतात.

पेट्रोलच्या दरात सातव्यांदा आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा घट मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून करण्यात आली आहे. या पूर्वी महिन्याच्या सुरूवातीला पेट्रोलच्या किंमतीत २.४१ रुपये प्रति लीटरने तर डिझेलच्या किंमतीत २.२५ रुपये प्रति लीटर घट झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून आलेल्या घटीमुळे ही कपात होऊ शकते.

Leave a Comment