महिन्याअखेरीस होणार मंत्रिमंडळ विस्तार

devendra-fadnavis
मुंबई – राज्यातील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार २९ किंवा ३० नोव्हेंबरला होण्याची शक्यता असून यावेळी ६ कॅबिनेट आणि १४ राज्यमंत्री शपथ घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मंत्रिमंडळविस्तारात राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटेंचाही समावेश होणार आहे.

त्याचबरोबर भाजपचे जामनेरचे आमदार गिरीश महाजन आणि पुण्यातील कसबा पेठचे आमदार गिरीश बापट, सिंदखेडाचे आमदार जयकुमार रावळ आणि चैनसुख संचेती यांनाही कॅबिनेटमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे.

अशाप्रकारे मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी
कॅबिनेट मंत्री – १) गिरीश बापट, २) गिरीश महाजन, ३) चैनसुख संचेती किंवा गोवर्धन शर्मा, ४) महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष), ५) मंगलप्रभात लोढा, ६) सुनील देशमुख,

राज्यमंत्री – १) राम शिंदे, २) जयकुमार रावळ, ३) संभाजी पाटील निलंगेकर, ४) सुभाष देशमुख, ५) सुरेश खाडे किंवा शिवाजीराव नाईक, ६) सीमा हिरे किंवा देवयानी फरांदे, ७) चंद्रशेखर बावनकुळे, ८) कृष्णा खोपडे, ९) बाळा भेगडे, १०) बबन लोणीकर, ११) मदन येरावार, १२) सदाभाऊ खोत (स्वाभिमानी शेतकरी), १३) विनायक मेटे (शिवसंग्राम), १४) भूपेश थुलकर किंवा अविनाश महातेकर (आरपीआय).

Leave a Comment