व्हॉलीबॉल सामन्यात आत्मघाती स्फोटात ५० ठार

attack
काबूल – पूर्व अफगाणिस्तानातील पकरिका प्रांतात व्हॉलीबॉलचा सामना सुरू असताना घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात किमान ५० जण ठार तर ६० हून अधिक लोक जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. रविवारी ही घटना घडली.

पकरिया प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर अताउल्ला फजली यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॉलीबॉलची ही मॅच पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जसे नागरिक जमले होते तसेच पोलिस आणि प्रांतअधिकारीही जमले होते. हल्लेखोर मोटरसायकलवरून थेट सामन्याच्या ठिकाणी आला आणि अंगावर बांधलेल्या स्फोटकांचा त्याने स्फोट घडविला. यामुळे ५० लोक जागेवरच ठार झाले. अनेक जखमींची प्रकृतीही चिंताजनक आहे.

सप्टेंबरमध्येच अफगाणिस्तानच्या सत्तेवर आलेले राष्ट्रपती अशरफ गनी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्ला झालेला प्रांत पाकिस्तान सीमेजवळ असून हा प्रांत अशांत टापू म्हणून ओळखला जातो.

Leave a Comment