जगज्जेता ठरला कार्लसन

carlsen
सोची – ११व्या डावात आव्हानवीर विश्वनाथन आनंदला ४५ चालींत नमवत नॉर्वेच्या अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने जगज्जेतेपद राखण्यात यश मिळवले.

कार्लसनला स्पर्धेचा विजयी समारोप आनंदने मिडलगेममध्ये झटपट चाली खेळण्याच्या नादात केलेल्या काही चुकांमुळे करता आला.याबरोबरच मंगळवारी होणारा १२वा आणि अखेरचा एक डाव बाकी ठेवून कार्लसनने दुस-यांदा जगज्जेतेपदावर नाव कोरले.

याउलट कारकीर्दीत सहाव्यांदा जगज्जेतेपद पटकवण्याची आनंदची संधी हुकली. या डावात आनंदने काळ्या मोह-या घेऊन खेळताना बर्लिन डिफेन्सचा अवलंब केला होता. त्याप्रमाणे २६व्या चालीपर्यंत त्याला विजयाची संधी दिसत होती. मात्र ऐनवेळी कार्लसनने बाजू उलटवली.

रविवारी ११व्या डावात आनंद काळ्या मोह-यांनिशी खेळत होता. कार्लसनने पांढ-या मोह-यांनी खेळण्याचा फायदा उचलला. आव्हान कायम राखण्यासाठी आनंदला आज विजय आवश्यक होता. कार्लसनने अकरा डावांमध्ये तीन विजय मिळवले तर, आनंदला फक्त एक विजय मिळवता आला होता. आनंदने आतापर्यंत पाचवेळा जगज्जेतेपद मिळवले आहे तर कार्लसनने सलग दुस-यांदा विजेतेपद मिळवले.

Leave a Comment