नव्या मंत्र्यांचा संघ घेणार क्लास

devendra-fadnvis
नागपूर – आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे महाराष्ट्रातल्या भाजप सरकारमधील नव्या मंत्र्यांचा क्लास घेणार आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पुढच्या महिन्यातील २ तारखेला विशेष हिवाळी वर्गाचे आयोजन करण्यात आले सून यावेळी नवीन मंत्र्यांना संघाच्या मुख्यालयात सरकार्यवाहक भैयाजी जोशी हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

याशिवाय २ डिसेंबरला राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्यांनाही या मार्गदर्शन वर्गाला सामोरे जावे लागणार आहे. संघांच्या उद्दिष्टांची पूर्तता व्हावी हा या वर्गांमागचा प्रमुख हेतू आहे. नव्या मंत्रिमंडळाचे पहिले अधिवेशन ८ डिसेंबरला सुरु होत आहे. त्याआधीच संघातर्फे मार्गदर्शन केले जाईल.

Leave a Comment