हाँगकाँग सुपर सिरीज स्पर्धेत सायना पराभूत

saina
हाँगकाँग – शुकवारी हाँगकाँग सुपर सिरीज स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेतील महिला एकेरीतील भारताचे आव्हान सायनाच्या पराभवामुळे संपुष्टात आले आहे.

तिस-या सीडेड सायनाचा ३९ मिनिटे चाललेल्या या खेळात चीन तैपेईच्या तै त्झू यिंगने १५-२१ आणि १९-२१ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या सायनाने नुकतेच चीन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.

तत्पूर्वी, महिला एकेरीच्या अन्य लढतीत सिंधूला जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून १७-२१, २१-१३, ११-२१ असा पराभवाचा स्वीकारावा लागल्याने तिचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते.

Leave a Comment