
पुणे – वारजे येथील शाळेत शिकणार्या सहा वर्षांच्या मुलीवर रेप केल्याचा अहवाल मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर ससूनमधील डॉक्टरांनी दिला आहे. या संदर्भात मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलिस चौकीत दाखल केलेल्या फिर्यादीनंतर संबंधित चालक संदीप कुंभार याला पोलिसांनी अटक करून न्यायालयाकडून पोलिस कोठडी घेतली होती.
मुलीवर रेप झाल्याचा ससूनचा अहवाल आला
कुंभारे याने ११ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या काळात त्याच्या व्हॅनमधून अन्य विद्यार्थी उतरल्यानंतर या सहा वर्षीय मुलीवर लैगिक अत्याचार केले होते. मुलीने घरी ही माहिती देताच आईने पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी व्हॅनमधील अन्य मुलांकडेही चौकशी केली होती. त्यानंतर कुंभारेला अटक करण्यात आली होती.
या संदर्भात प्रादेशिक परिवहन विभागही स्वतंत्रपणे चौकशी करणार असल्याचे समजते. शाळा प्रशासन, शाळेची वाहतूक कमिटी, कुंभारचा विद्यार्थी वाहतूक परवाना, शाळेने त्याला दिलेला अधिकृत परवाना यांची तपासणी करून कुंभारे दोषी आढळला तर त्याच्याविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कुंभारेने कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आणखी एक गुन्हा या अगोदरच पोलिसांनी दाखल केला असल्याचेही समजते.
