सँट्रोचा भारतीय बाजाराला अलविदा

santro
भारतीय कार बाजारात दीर्घकाळ ग्राहकांची पसंती लाभलेल्या कोरियन कंपनी ह्युंदाईच्या सँट्रो कारचे उत्पादन बंद केले गेले आहे. यापूर्वी मारूती ८०० आणि अँबेसिडर या गाड्यांचे उत्पादन बंद झाल्यानंतर सँट्रो ही तिसरी उत्पादन बंद झालेली कार ठरली आहे.

शाहरूख खानने जाहिरात केलेल्या या कारची टॅगलाईन होती सनशाईन कार अशी. ही जाहिरात खूपच लोकप्रिय ठरली होती आणि सँट्रो कारनेही भारतीय ग्राहकांच्या मनाचा ताबा घेण्यात यश मिळविले होते. मध्यमवर्गीय भारतीयांची ही विशेष पसंतीची कार ठरली होती. १९९८ मध्ये लाँच झालेली ही कार फुली लोडेड पहिलीच हचबॅक कार होती शिवाय आधुनिक फिचर्सनीही ती युक्त होती. नोव्हेंबर मध्ये या कारचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. म्हणजे एका अर्थाने सँट्रोने भारतीय बाजाराला अलविदा केले आहे.

Leave a Comment