वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया फायदेशीर

omg
अलीकडच्या काळामध्ये वजन कमी करण्याचे बरेच प्रयत्न करून सुद्धा लोकांचे वजन कमी होत नाही. त्यामुळे काही लोक औषधे घेऊन लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न करतात. असे असले तरी औषधांचा सुद्धा फायदा होत नाही. त्यावर डॉक्टर मंडळींनी शस्त्रक्रियेचा उपाय शोधून काढला आहे आणि शस्त्रक्रिया केल्याने बर्‍याच लोकांचा लठ्ठपणा आटोक्यात आल्याचे दिसून आले आहे. राजकारणात असल्यामुळे ज्यांची छायाचित्रे वारंवार छापून येतात अशा काही लोकांच्या छायाचित्रांवरून त्यांची जाडी अचानकपणे कमी झाल्याचे दिसून येते. भारतात सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत आणि काही नेत्यांनी शस्त्रक्रियेद्वारा जाडी नियंत्रणात ठेवल्याचे दिसून आले आहे.

या शस्त्रक्रियेचे अन्यही काही फायदे दिसून यायला लागले आहेत. या शस्त्रक्रियेमुळे वजन तर कमी होतेच, पण मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेतही वाढ होते असे एका अभ्यासात आढळून आले आहे. अमेरिकेतल्या पेनसेल्वानिया येथील एका वैद्यकीय संस्थेत केलेल्या पाहणीत या शस्त्रक्रियेचा हा पूरक फायदा आढळला आहे. या केंद्रामध्ये वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करून घेतलेल्या ३ हजार १३४ रुग्णांच्या आरोग्याच्या अनेक नोंदी केल्या गेल्या.

या पाहणीत असे आढळले की, त्यातल्या बहुतेक रुग्णांच्या वजनात १३० किलोवरून ९० किलो अशी सरासरी घट झाली. त्याचवेळी त्यांच्या मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेत सुद्धा वाढ झाली. विशेषत: ज्या रुग्णांना मूत्रपिंडाचे काही विकार होते त्यांना या शस्त्रक्रियेमुळे अधिक लाभ झाला असे आढळून आले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment