अमेरिकी केसिंगसह १८ सिरीयाई सैनिकांचाही शिरच्छेद

keshing
बेरूत – इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी सिरीयात मदत कार्यासाठी गेलेल्या अमेरिकन पीटर केसिंग यांचा शिरच्छेद केल्याचा व्हिडीओ नुकताच प्रसारित केला असून त्यांच्या या कृत्याचा निषेध करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हे कृत्य अत्यंत क्रूरतेचे व मानवतेला काळीमा लावणारे असल्याचे मत व्यक्त केले आहे.

पीटर केसिंगला मृत्यूदंड देतानाच या दहशतवाद्यांनी सिरीयासाठी लढाईत उतरलेल्या अन्य १८ जणांनाही यमसदनास पाठविले असून त्याचाही व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे. पीटर या युद्धात जखमी झालेल्या सिरीयाच्या सैनिकांची सेवा करण्यासाठी सिरीयात गेला होता. त्याचा शिरच्छेद करणारा ब्रिटीश वंशाचा जिहादी जॉन असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इस्लामिक स्टेटच्या मिडिया विंग अल फुर्कन यांच्यातर्फे जारी केला आहे. व्हिडीओत बुरखाधारी केसिंगचे दफन करत असल्याचे व पुढील शत्रूंची वाट पाहात असल्याचे सांगताना दिसत आहे. त्याच्या हातात कलम केलेले केसिंगचे डोके दिसत आहे.

Leave a Comment