रेस मध्ये फेरारीला मात देणारी सायकल

ferrari
रेस आणि फेरारी यांचे अतूट नाते आहे. मनाच्या वेगाने धावणार्या फेरारीला एका सायकलने मात दिली असे सांगितले तर कदाचित त्यावर आपला विश्वास बसणार नाही. मात्र हे नवल घडविले आहे फ्रान्सच्या सायकलपटूने. फ्रकोइह गिस्सी या माणसाने आपल्या कामिकेल 5 या अद्भूत सायकलच्या सहाय्याने ही किमया साध्य केली आहे.

गिस्सीने त्याच्या या सायकलला रॉकेट जोडून ती अतिवेगाने पळविण्यान नवे रेकॉर्ड प‘स्थापित केले आहे.त्याने ही सायकल रॉकेटच्या मदतीने तासाला 200 मैल म्हणजे 333 किलोमीटरच्या वेगाने पळविली. मार्सो शहरातील पॉल रेकॉर्ड रेस ट्रॅकवर त्याने 408 सेकंदात सर्वाधिक वेग गाठण्याची किमया केली. यापुढचे त्याचे लक्ष्य आहे ती 250 मैलांचा वेग गाठण्याचे.

यापूर्वीचे जमिनीवर सायकल चालविण्याचे रेकॉर्ड नेदरर्लंडच्या फ्रेड रॉम्पेलबर्ग याच्या नावावर असून त्याने ताशी 286 किमी वेगाने सायकल चालविली आहे.

पहा त्याचा व्हिडियो

Leave a Comment