उच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी – मेटे

mete
मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला दिलेला स्थगितीचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने राणे समितीच्या सगळ्या शिफारशी रद्द करीत मराठा आरक्षणाला पूर्णत: स्थगिती दिली असून मुस्लिमांच्या बाबतीत शिक्षण आणि नोकरीच्या बाबतीत पुन्हा एकदा सरकारने विचार करावा, असा सल्ला देखील राज्य सरकारला दिला आहे.

त्याच बरोबर मराठा-मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण आम्ही रद्द होऊ देणार नाही आणि वेळ पडल्यास वरपर्यंत यांची दाद मागू. कायद्यात बदल करावा लागला तर मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगून तसा बदल करून घेऊ. पण, मराठा आणि मुस्लिम समाजावर अन्याय होऊ देणार नाही असेही मेटे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment