विधानसभा अध्यक्षपदी हरिभाऊ बागडे यांची निवड

vidhansabha
मुंबई – हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार हरीभाऊ बागडे यांची महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली.

बागडे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलांब्री विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच पक्षाचे प्रमुख नेते हरिभाऊ बागडे यांना अध्यक्षाच्या आसनापर्यंत घेऊन गेले. विधानसभा अध्यक्षांची एकमताने निवड करण्याची परंपरा कायम राखल्याबद्दल फडणवीस यांनी सर्व पक्षांचे आभार मानले.

Leave a Comment