गुगल नासामध्ये एतिहासिक भाडे करार

nasa
तंत्रज्ञान कंपनी गुगल आणि अमेरिकेची स्पेस संस्था नासा यांच्यात नौसेना एअरबेस जागेसंदर्भात ऐतिहासिक भाडेकरार झाला असून ६० वर्षांच्या दीर्घकालीन करारापोटी गुगल नासाला १ अब्ज ६० कोटी डॉलर्स भाडे देणार असल्याचे समजते. या जागेत एअरफिल्ड, गोल्फ कोर्स व अन्य इमारती असून ही जागा १ हजार एकर इतकी आहे.

नासामधील अधिकारी या संदर्भात माहिती देताना म्हणाले की ही जागा मोफेल फिल्ड नेव्हल एअरस्टेशनचाच एक भाग आहे. या ठिकाणी गुगल ३ मोठे हँगर उभारणार आहे. त्यांच्या उपयोग विमानोड्डाण, अंतराळ शोध आणि रोबोटिक्स संबंधित योजनांसाठी केला जाणार आहे. त्यासाठी गुगल २० कोटी डॉलर्सची गुंतवणूकही करणार आहे. त्यात सिलीकॉन व्हॅली आणि मोफेट संबंधी संग्रहालयाचा समावेश आहे.

गुगलची सहाय्यक कंपनी प्लेनेटरी व्हेंचर एलएलसी उभारण्यात येणार्‍या हँगरचा उपयोग अंतराळ शोध, रोवर रोबोटिक्स क्षेत्रातील संशोधन, विकास आणि अंतराळ परिक्षणांसाठी करणार असल्याचे समजते.

Leave a Comment