प्रणिती शिंदे यांची शिवसेनेकडून पाठराखण

praniti-shinde
मुंबई : आमदार प्रणिती शिंदे यांनी देशवासियांची भावना ‘एमआयएम’च्या विखारी कार्यपद्धतीवर टीका करून बोलून दाखविली आहे, अशा शब्दांत शिंदे यांची पाठराखण शिवेसेनेने केली आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एमआयएम’वर कठोर कारवाई करावी, अशी मागणाही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

‘एमआयएम’वर टीकास्त्र सोडत आमदार प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. ‘सामना’च्या अग्रलेखात करण्यात आले आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘एमआयएम’ हा राष्ट्रद्रोही पक्ष असल्याने त्यांच्यावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यावर ‘एमआयएम’ने त्यांना नोटीस पाठवून आठ दिवसात माफी मागावी, अशी भंपक मागणी केली. याप्रकरणी शिवसेना आमदार शिंदे यांच्या मागे उभी राहिली आहे. ‘एमआयएम’ने नांदेड महानगरपालिकेत चांगला शिरकाव केला. हैदराबाद नंतर मराठवाडा हे ‘एमआयएम’च्या धर्मांध दारूगोळयाचे कोठार बनले. विधानसभा निवडणुकीत त्यांचे दोन आमदार निवडून आले व १४ मतदारसंघात त्यांना दुस-या किंवा तिस-या क्रमांकाची मते मिळाल्यामुळे त्यांचा उन्माद व आरोळया वाढल्या असतील तर फडणवीस सरकारने त्यांच्यावर वेळीच कठोर कारवाई करण्याची मागणी अग्रलेखात करण्यात आली आहे.

Leave a Comment