सेन्सेक्स, निफ्टीने गाठला ऐतिहासिक उच्चांक

share-market
मुंबई – सोमवारी आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने केली असून सेन्सेक्सने आज सकाळी बाजार उघडताच २८ हजार २७.९६ या विक्रमी स्तराला स्पर्श केला तर निफ्टीतही कमालीची वाढ होत तो आठ हजार ३८३.०५ या उच्चांकी स्तरावर पोहोचला.

सेन्सेक्समध्ये १५९.३३ अंकांची वाढ होत तो २८ हजार २७.९६ या विक्रमी स्तरावर पोहोचला तर निफ्टीत ४६.०५ अंकाची वाढ होत तो सर्वाधिक आठ हजार ३८३.०५ या स्तरावर पोहोचला.

मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा झालेला विस्तार आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून वाढत चाललेली गुंतवणूक या दोन्हींचा फायदा सेन्सेक्स आणि निफ्टीला ऐतिहासिक स्तरावर पोहोचण्यास कारणीभूत ठरल्याचे दलालांनी सांगितले.

Leave a Comment