कोका कोलाची फ्रूट सॉफ्ट ड्रिंक्स येणार

cola
कोका कोला या अमेरिकन कंपनीने त्यांच्या सॉफट ड्रिंक्स मध्ये फ्रूट ज्यूस वापरण्यासंबंधीच्या चाचण्या सुरू केल्या असून त्यांची ही नवी उत्पादने एप्रिलमध्ये भारताच्या बाजारात दाखल होतील असे समजते. कंपनीच्या या निर्णयाचा मोठा लाभ फळ उत्पादक शेतकर्‍यांना होणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी अमेरिका भेटीवर असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पेप्सी आणि कोक कंपनीने त्यांच्या सॉफट ड्रिंक्स मध्ये फळांच्या ज्यूसचा वापर करावा असा प्रस्ताव मांडला होता. त्याला कोकाकोला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या कंपन्यांनी आपल्या पेयांमध्ये केवळ ५ टक्के फळ रसांचा वापर केला तरी त्याचा फार मोठा लाभ फळ उत्पादक शेतकर्‍यांना होणार आहे. अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेल्या या कंपन्यांचा फळ रस वापराचा निर्णय म्हणून फार महत्त्वाचा ठरणार आहे.

कोका कोलाने या सबंधीचे संशोधन आणि चाचण्या भारतातच सुरू केल्या असल्याचेही सांगितले जात आहे. फ्रूट ज्यूस मिश्रित शीतपेये बाजारात आणण्याचा कंपनीचा हा पहिलाच प्रयत्न आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीला म्हणजे एप्रिलमध्ये ही शीतपेये बाजारात दाखल होतील असे समजते.

Leave a Comment