एचएसबी बँकेने दिलेल्या खातेदारांच्या यादीतील खात्यात खुळखुळाट

hsbc
नवी दिल्ली – स्वित्झर्लंडच्या एचएसबीसी बँकेने दिलेल्या यादीतील २८९ खात्यात छदामही जमा नसल्याचे एसआयटीला आढळले. स्विस बँकेकडून भारताला मिळालेल्या ६२८ जणांच्या यादीत १२२ नावे दोनवेळा लिहिण्यात आल्याचेही समोर आले. एचएसबीसीच्या जिनेव्हा शाखेतील कर्मचार्‍याकडून ही यादी २००६ मध्ये मिळाली होती. फ्रान्सने जून २००१ मध्ये ती भारताला दिली. सूत्रांनुसार प्राप्तिकर खाते ३०० खातेदारांविरुद्ध खटला चालवणार आहे. या प्रकरणी एसआयटीने ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्टात प्राथमिक अहवाल दिला. स्विस बँकेतील खाती कधी उघडली, त्यात कधी व किती देवाणघेवाण झाली, हा तपशील उपलब्ध नाही. त्यामुळे काळ्या पैसेवाल्यांविरुद्ध कारवाईत अडचण येणार आहे.

Leave a Comment