भारतीय क्रीडा प्राधिकरणाने फेटाळले गर्भधारणा चाचणीचे आरोप

boxing
नवी दिल्ली – भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) दक्षिण कोरियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भाग घेणाऱ्या अल्पवयीन महिला बॉक्सर्सची गर्भधारणा चाचणी (प्रेग्नन्सी टेस्ट) केल्याचे आरोप फेटाळून लावले आहे.

या स्पर्धेसाठी खेळाडूंची वयोमर्यादा १९ वर्षे असल्यामुळे या खेळाडू महिलांची गर्भधारणा चाचणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ‘साई’चे संचालक जीजी थॉमसन यांनी स्पष्ट केले आहे. ‘बॉक्सिंग इंडिया’च्या आदेशावरून विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या खेळाडूंची भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे चाचण्या करून घेतल्या जातात. आम्ही केवळ बॉक्सिंग इंडिया आणि खेळाडूंच्या मागणीनुसार जागतिक बॉक्सिंग असोसिएशनच्या नियमांचे पालन केले, असे थॉमसन यांनी सांगितले.

Leave a Comment