
लाहोर – खिश्चन दाम्पत्याला पवित्र कुराणचा अनादर केला म्हणून जिवंत जाळल्याप्रकरणी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील ६०० जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खिश्चन दाम्पत्याला जिवंत जाळल्याप्रकरणी ६०० जणांविरुद्ध तक्रार
शहजाद मसीह आणि त्यांची गर्भवती पत्नी शमा यांना कुराणाचा अनादर केल्याने संतप्त झालेल्या जमावाने जाळण्यात आले होते. पंजाब प्रांतातील कसूर जिल्ह्यातील कोटा राधा किसन गावात ही घटना घटली होती. जमावाने प्रथम या दोघांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांना जाळण्यात आले.
या प्रकरणी आम्ही ६०० जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच ५० जणांना अटक करण्यात आल्याचे कसूर जिल्हा पोलिस प्रमुखांनी सांगितले. याच बरोबर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तिघांची समिती नेमण्यात आली आहे.
