आणखी एका ठाकरेंची राजकारणात एन्ट्री

amit-thackary
मुंबई – आणखी एका ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होत असून आणि हे नवे ठाकरे आहेत अमित राज ठाकरे.

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यव्यापी दौरा आयोजित केला होता. मात्र त्यांची मुलगी उर्वशी हिला अपघात झाल्याने सध्या ते कौटुंबिक कारणांमुळे व्यस्त आहेत. पण आता वडिलांचा वारसा चालवायचे अमित ठाकरे यांनी ठरवले आहे.

अमित ठाकरे यांनी बुधवारपासून विधानसभा मतदारसंघांना भेट द्यायला सुरुवात केली. प्रथम त्यांनी मलबार हिल आणि मुंबादेवी या विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Leave a Comment