कंपन्या बंद करण्याची रॉबर्ट वढेरांवर वेळ

robert-vadra
नवी दिल्ली : रॉबर्ट वढेरा यांच्या जमीन खरेदीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून याचवेळी आणखी एक बातमी अशी आली आहे की वाड्रा यांनी आपल्या काही कंपन्यांना टाळे ठोकले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार रॉबर्ट वढेरा यांनी राजस्थान आणि हरियाणामधील आपल्या चार कंपन्या बंद केल्या आहेत. रॉबर्ट वढेरा यांनी ६ कंपन्या राज्यस्थान आणि हररियाणामध्ये सुरु केल्या होत्या. त्यातील चार बंद केल्या आहेत. यामध्ये लाईफलाईन अॅग्रोटेक प्रा. लि., ग्रीनवेअर अॅग्रो प्रा. लि., राईटलाईन अॅग्रीकल्चर आणि प्राईमटाईन अॅग्रो प्रा. लि. यांचा समावेश आहे. या वृत्तपत्रानुसार वृत्तानुसार आणखी काही कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व कंपन्यांची सुरुवात २०१२ मध्ये करण्यात आली होती.

Leave a Comment