राष्ट्रवादीचे घोडे संघाच्या भूमिकेमुळे अडले

trio
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास सपशेल नकार दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेवर अखेर पडदा पडला आहे. आता सत्ता स्थापनेसाठी भाजपाने शिवसेनेचा पाठिंबा घेण्याची तयारी सुरू केली. मात्र शिवसेनेला सत्तेत सन्मानकारक वाटा मिळावा, अशी अपेक्षा आहे. तशी मागणी सेना नेत्यांनी भाजपाकडे केली आहे. दोनास एक या प्रमाणे शिवसेनेला दहा मंत्रिपदे देण्यास भाजपा नेते तयार झाले आहेत. मात्र, उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजपा तयार नसल्याचे समजते.

शिवसेनेचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. आता उपमुख्यमंत्रिपदाशिवाय दहा मंत्रिपदे स्विकारून शिवसेना सत्तेत सहभागी होणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Leave a Comment