नालासोपा-यात दिवसाढवळया गोळया झाडून बिल्डरची हत्या

murder
नालासोपारा – बुधवारी दिवसाढवळया गोळया झाडून हत्या नालासोपारा भागातील बिल्डर राजेश सिंह यांची करण्यात आली. राजेश सिंह यांचे कार्यालय नालासोपारा पूर्वेला असून दुपारी बाराच्या सुमारास ते कार्यालयाबाहेर उभे असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळया झाडल्या.

राजेश सिंह रक्ताच्या थारोळयात कोसळल्यानंतर त्यांना लगेचच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राजेश सिंह यांची खुशबू डेव्हलपर्स नावाची बांधकाम कंपनी आहे.

प्रथमदर्शनी जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून याबाबत पोलिस प्रत्यशदर्शींकडून माहिती घेऊन, आरोपींचा शोध घेत आहे.

Leave a Comment