काँग्रेसची ६ नोव्हेंबरला नेता निवडीसाठी बैठक

congress
मुंबई – काँग्रेसने ६ नोव्हेंबर रोजी विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीसाठी आमदारांची बैठक बोलावली असून ही बैठक काँग्रेसच्या निवडणूक समितीचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे आणि प्रभारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत पार पडेल.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह डॉ. पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाची काँग्रेसमध्ये विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी चर्चा आहे. पक्षात चव्हाण यांच्या नावाला विरोध होत असल्याने नेतेपदी तरुण चेह-याची निवड करावी, असाही मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाल्यास विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेतेपद हे काँग्रेसला मिळणार असल्यामुळे काँग्रेसमध्ये विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ६ नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता विधानभवनात होणार आहे.

Leave a Comment