लाचलुचपत विभागाचा माजी मंत्री धस यांच्या बंगल्यावर छापा

suresh-dhas
मुंबई – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्या कफ परेड येथील बंगल्यावर छापा टाकला असून या छाप्यात त्यांच्या बंगल्यातून देवस्थान जमिनीच्या आदेशाची मुळ प्रत आणि अन्य चार महत्त्वाच्या फाईल्स जप्त केल्या.

तत्कालीन महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्याकडे पुणे जिल्यातील एका देवस्थानच्या जमिनीप्रकरणात सुनावणी झाली होती. त्यावेळी जमिन खरेदी विक्री करणा-या एका व्यावसायिकाच्या बाजूने धस यांनी निकाल दिला होता. तथापि, हा आदेश देण्यासाठी महसूल विभागातील कक्ष अधिकारी, एजंट म्हणून काम करणारे वैभव आंधळे आणि देविदास दहिफळे यांनी या व्यावसायिकाकडे २५ लाखाची लाच मागितली होती. यापैकी २३ लाख रूपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले होते.

या प्रकरणात तत्कालीत राज्यमंत्री धस यांच्यावर देखील संशय व्यक्त केला गेला होता. त्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी देवस्थानाच्या जमिनीच्या आदेशाची मुळ प्रत आणि अन्य महत्त्वाच्या चार फाईल जप्त करण्यात आल्या.

Leave a Comment