
नागपूर – राज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची कोंडी करण्याची तयारी सुरु केली असून याबाबत अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढणे विचाराधीन असल्याचे नवनिर्वाचित अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी म्हटले आहे.
अजित पवारांची कोंडी करण्याची भाजपची तयारी
सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यावर तीन लाख कोटी कर्ज असल्याची माहिती त्याशिवाय जनतेच्या कामासाठी दिलेल्या निधीचा योग्य उपयोग झाला नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्याची खैर करणार नसल्याचेही यावेळी अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
आघाडी सरकारच्या काळातील अर्थखात्याची संपूर्ण माहिती अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता उघड होण्याची शक्यता असून यातून नेमके काय बाहेर येते हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
