शपथविधीनंतर सत्ता स्थापनेवर खलबत

shivsena
मुंबई – भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शपथविधी सोहळ्यानंतर शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून ही चर्चा स्टेडियमवरच पार पडली.

शिवसेनेने पाठविलेला प्रस्ताव भाजपाने फेटाळाला असल्याच्या वृत्तानंतर आता दोन्ही पक्षप्रमुखांच्या बैठकीत काय चर्चा झाली ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपाच्या नेत्यांनी शपथ घेतल्यानंतर आता शिवसेनेला सत्तेत सोबत घेणे आणि खातेवाटपाबाबतची चर्चा झाल्याचे समजते.

Leave a Comment