ब्राझीलच्या अध्यक्षपदी दिलमा रौसेफ विराजमान

dilima-rousaffe
नवी दिल्ली : दिलमा रौसेफ याच पुन्हा एकदा ब्राझीलमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून आल्या असून रौसेफ यांना प्रतिस्पर्धी एसिओ नेवेस यांच्यावर अगदी थोडय़ा फरकाने विजय मिळविता आला. रौसेफ यांना ५१.६ टक्के मते मिळाली तर नेवेस ४८.४ मते मिळविण्यात यश आले. दरम्यान, रौसेफ यांना विजय मिळविता आला असला तरी त्यांच्यासमोर अर्थव्यवस्था सुधारण्याचे मोठे आव्हान आहे. तसेच फुटबॉल विश्वकरंडकावेळी ब्राझीलमध्ये मोठी आंदोलने झाली होती. त्यानंतर ब्राझीलमध्ये मोठया प्रमाणात सरकारविरोधी आंदोलने होत आहेत.