आमदार गोविंद राठोड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

govind-rathod
जालना – देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला जाताना नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोविंद राठोड यांचे रविवारी रात्री ११ वाजता निधन झाले. त्यांना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण आधीच त्यांचे निधन झाले होते.

राठोड यांच्या छातीत देवगिरी एक्स्प्रेस परतूरला आली त्या वेळीच वेदना होत होत्या. औरंगाबादला गेल्यानंतर डॉक्टरांना दाखवू, असा विचार त्यांनी केला. मात्र, जालना दहा किमीवर असतानाच त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्या ते रेल्वेतच कोसळले. गाडी जालन्यात येताच त्यांना स्टेशनजवळीलच निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते.

आज मुंबईत भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होत असून या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी राठोड हे मुखेडहून मुंबईला जात होते.