
मुंबई – मुंबई पोलिसांनी भोजपुरी अभिनेता मनोज पांडे याच्यासह त्याचे दोन भाऊ दीपक आणि विजय पांडे यांना अटक केली असून या तिघांवरही मारहाण करून धमकी दिल्याचा गुन्हा चारकोप पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. चारकोप येथील सत्यप्रकाश सोसायटीतील एका व्यक्तीला या तिघांनीही बेदम मारहाण केली आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली.
धमकीप्रकरणी भोजपुरी अभिनेत्याला अटक
याप्रकरणी सोसायटीतल्या रहिवाशांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चारकोप पोलिसांनी या तिघांवरही कारवाई केली आहे. दिवाळीत फाटके फोडण्यावरुन पांडे बंधु आणि सोसायटीतील सदस्यांमध्ये बाचाबाची झाली होती.
