
स्टेलेनबोस्च – आपली मैत्रिण रिव्हा स्टीनकॅम्प हिच्या हत्येप्रकरणी ‘ब्लेड रनर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऑस्कर पिस्टोरियसला मंगळवारी न्यायालयाने पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली असून त्यानंतर लगेचच ऑस्करची रवानगी तुरूंगात करण्यात आली.
पिस्टोरियसला ५ वर्षांचा कारावास
२०१३ साली व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी मॉडेल रिव्हा स्टिनकॅम्प हिची हत्या झाली होती व ऑस्करवर तिच्या खुनाचा आरोप लावण्यात आला होता. याप्रकरणी ऑस्करवर खुनाचा आरोप लावण्यात आला होता व त्याला दहा वर्षांच्या तुरूंगावासाची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मात्र, रिव्हाच्या मृत्यूमुळे ऑस्कर आधीच दु:खी असून त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी असे बचाव पक्षाच्या वकिलांचे म्हणणे होते.
