प्रीतम मुंडे केला मोदींचा रेकॉर्ड ब्रेक

pritam
बीड – गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे यांना ६ लाख ९२ हजार मते मिळाली असून हा लोकसभेतील एक मोठा विक्रम मानला जात आहे. नरेंद्र मोदी यांचाही रेकॉर्ड प्रीतम मुंडे यांनी मोडीत काढला असून प्रीतम मुंडे यांनी लढवलेली लोकसभेची ही पहिलीच निवडणूक होती.

बीड लोकसभा मतदार संघासाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली. इतर पक्षांनी प्रीतम मुंडे यांच्याविरोधात उमेदवार उभा करणार नसल्याचे म्हटले होते, तर काँग्रेसने त्यांच्याकडून अशोकराव पाटील यांना उमेदवारी दिली होती. मुंडे कुटुंबीयांपैकी उमेदवार असल्याने उमेदवार न देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने देखील घेतला होता.

Leave a Comment