हो, हे शक्य आहे….

raj
मुंबई – गेल्या विधानसभा निवडणुकीत १३ जागा जिंकून यशस्वी ठरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा फुगा यावेळच्या निवडणुकीत फुटला आहे. गेल्या इतक्या जागा जिंकण्यातही मनसेला यश मिळाले नसून, मुंबईसह नाशिक आणि पुणे या बालेकिल्ल्यात सर्वच ठिकाणी मनसेचे पुरती पिछेहाट झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा झटका मानण्यात येतो आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली बहुप्रतिक्षित ब्ल्यू प्रिंटही पक्षाने यावेळी निवडणुकीपू्र्वी सादर केली होती. मात्र, या सगळ्याला मतदारांनी पाठिंबा दिल्याचे दिसत नाही. गेल्यावेळी ज्या भागातून मनसेचे उमेदवार विजयी झाले होते. तिथे सर्वच ठिकाणी यंदा पक्षाची पिछेहाट झालेली दिसते. यावेळी शिवसेना, भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. मात्र, याचा थेट फायदा घेण्यात मनसेचे उमेदवार अपयशी ठरले.

Leave a Comment