राष्ट्रवादीने घेतला भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय, मात्र संघाचा विरोध

combo
मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस देईल अशी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार हेदेखील तिथे उपस्थित होते.

राज्यात पुढील सरकार स्थापण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस महत्त्वाची भूमिका बजावेल, असे ट्विट दोन दिवसांपूर्वीच प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. त्याचाच पुढचा भाग म्हणजे या पक्षाने भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी सत्तेमध्ये सहभागी होणार नसून, केवळ भाजपला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी ४३ जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे आणि भाजपला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी २५ आमदारांच्या पाठिंब्याची गरज असल्यामुळे राष्ट्रवादीचा पाठिंबा स्वीकारल्यास भाजपला शिवसेनेचीही मदत घेण्याची गरज पडणार नाही. आत्ता भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा स्वीकारून सत्तास्थापन करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment