निवडणूक आयोगाला राज यांनी दिले स्पष्टीकरण

raj
मुंबई – परप्रांतियांविरूद्धच्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने मनसे प्रमुख राज ठाकरेंना नोटीस बजावली होती. त्यानुसार याबाबत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे खुलासा केला आहे.

त्या नोटीशीबाबत आयोगाकडे स्पष्टीकरण करताना, राज ठाकरेंनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले असून, कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

परप्रांतियांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने राज ठाकरे यांना १३ ऑक्टोबर रोजी नोटीस पाठवली होती. पाच ऑक्टोबरला घाटकोपरला आणि सात ऑक्टोबरला कालिनामध्ये झालेल्या सभेत, निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग केल्याचा ठपका राज ठाकरेंवर ठेवण्यात आला होता.

“माझ्या हाती सत्ता दिल्यास, आल्या दिवसापासून महाराष्ट्रात जे उद्योग येतील त्या सर्वांमध्ये फक्त मराठी भाषिकांना नोकऱ्या मिळतील. परप्रांतातून येणाऱ्यांना नोकऱ्या मिळू देणार नाही”, असे वक्तव्य राज ठाकरेंनी पाच ऑक्टोबरच्या घाटकोपरच्या सभेत केले होते.

Leave a Comment