उदयसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता

udaysingh
सातारा – आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांचे पुत्र उदयसिंह पाटील यांची सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या हत्येप्रकरणी निर्दोष मुक्तता केली. तसेच इतर नऊ जणांचीही सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

कराडमध्ये गोळी घालून १५ जानेवारी २००९ मध्ये संजय पाटील यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी १२ जणांना आरोपी करण्यात आले होते. आरोपीमध्ये उदयसिंह पाटील यांचाही समावेश होता. या प्रकरणी गेल्या २० महिन्यांपासून ते तुरुंगात होते.

अखेर शनिवारी न्यायालयाने सुनावणीदरम्यान उदयसिंह पाटील यांच्यासह इतर नऊ जणांचीही सुटका केली आहे. तर हमीद शेख आणि सागर परमार यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.