‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी टेनिसपटू सानियाने घेतला हातात झाडू

sania
हैदराबाद – टेनिस स्टार सानिया मिर्झाने गुरुवारी ‘स्वच्छ भारत’ अभियानात सहभाग घेतला. तिने हैदराबाद मधील रस्त्यांवर झाडू हातात घेतला आणि आपल्या सोबतच्या ९ खेळाडू तसेच बॉलिवुड हस्तींची नावे अभियानासाठी जोडली. उद्योगपती अनिल अंबानी यांनी सानियाचे नामांकन केले होते. त्यामुळे आपले वडिल इम्रान आणि सहका-यांसोबत हातात झाडू घेऊन शहरात सफार्इ केली. अशियार्इ खेळातील सुवर्ण पदक विजेती सानियाने ट्विटरवरून आपला विडियो प्रकाशित केला आणि त्या संदेशात तिने म्हटले आहे की, आमच्या या प्रयत्नाचे देखील अनुकरण केले जार्इल आणि त्यासाठी मी ९ जणांची नावे सुचविते. सानियाने आपले सहकारी सोमदेव देववर्मन, दीपिका पल्लीकल, बॅडमिंटनमधील पी वी सिंधू, नेमबाज अभिनव बिंद्रा आणि बॉलिवुडचे शाहरूख खान, रितेश देशमुख, साजिद खान, तेलगू स्टार रामचरण तसेच तेलंगणामधील राजकीय नेते केटी रामाराव यांची नावे सुचविली.

Leave a Comment