एकदिवसीय क्रिकेटच्या ५१ वर्षाच्या इतिहासात नवा विक्रम

james
सिडनी – एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करण्याची कामगिरी सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी करून दाखविली आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जेम्स टूलने तिहेरी शतक करून जगभरात खळबळ माजविली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेटर हिलसाठी खेळणा-या जेम्स टूलने क्विन्स लॅंड वेअर हाऊस क्रिकेट संघटनेच्या स्पर्धेत क्लब सामन्यात सिलेंट एसेसिंग संघाविरूद्द ३४१ धावांची वादळी खेळी केली. त्यादरम्यान त्याने २५ षटकार आणि ३४ चौकार मारले. याची बेरीज केली तर ती २८६ इतकी होते. त्याच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य हे होते की, त्याच्या संघातील दुस-या खेळाडूंच्या सर्वाधिक धावा ३६ होत्या, ज्या ट्रायडिन याने केल्या होत्या. दोघांनी मिळून ५ व्या विकेटसाठी २१२ धावांची भागीदारी केली. जेम्स डावातील ४२ व्या षटकात बाद झाला. ४५ षटकांच्या या सामन्यात जेम्सचा संघ ४ बळी गमावून ४५७ धावा करू शकला. त्याला प्रत्युत्तर देताना प्रतिस्पर्धी संघाने केवळ २३२ धावा केल्या. जेम्स एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या सामन्यात मध्यांतरापर्यंत १५ द्विशतके करणारा खेळाडू ठरला आहे. परंतु तिहेरी शतक करणारा कुणीही फलंदाज नाही. ५१ वर्षाच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात हे पहिलेच तिहेरी शतक आहे. याआधीची सर्वाधिक धावसंख्या इंग्लंडच्या एलिस्टर ब्राउन याच्या नावे आहे. त्याने १९ जून २००२ मध्ये २६८ धावा केल्या होत्या.

Leave a Comment