भारतातील पर्यटनस्थळे दहशतवाद्यांच्या रडारवर

tourism
नवी दिल्ली – दहशतवाद्यांच्या रडारवर भारतातील पर्यटन स्थळे असून भारतातल्या पर्यटनस्थळांवर अल कायदा आणि इसिस या दहशतवादी संघटना संयुक्त हल्ले करण्याची शक्यता एनएसजीचे महासंचालक जयंत चौधरी यांनी वर्तवली आहे. त्याचवेळी कोणत्याही प्रकारच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी भारताची सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दहशतवादी संघटनांनी आपला मोर्चा भारताकडे वळल्याचे दिसत आहे. काश्मीरमध्ये ईद दरम्यान इसिस या दहशतवादी संघटनेचाही झेंडाही दिसून आला आहे. अल-कायदा, इंडियन मुजाहिद्दीन, लश्कर आणि आयएसआयएस दहशतवादी यांच्यामध्ये संघटन वाढविण्यावर भर दिसत आहे.

दहशतवादी अल-कायदा या अतिरेकी संघटनेच्या माध्यमातून हल्ले करु शकतात. अल-कायदाचे अतिरेकी पर्यटन ठिकाणांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. भारतात आत्मघातील हल्ले करण्याची तयारी अल-कायदा या संघटनेने केली आहे. यासाठी इंडियन मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मद, लश्कर ए तैयबा, आयएसआयएस आदी अतिरेकी संघटना एकत्र येऊन एकाचवेळी काही शहरांवर हल्ले करु शकतात.

Leave a Comment