आचारसंहितेत बोनसच्या ठरावाला मंजूरी दिल्यामुळे संचालकांवर गुन्हा दाखल

sangali
सांगली – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. असे असताना २३ सप्टेंबर रोजी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाने बैठक बोलावून बँकेच्या कर्मचा-यांना दिड महिन्याचा बोनस देण्याबाबतचा ठराव मंजूर केला होता. या ठरावावर आक्षेप घेत बँकेच्या काही संचालकांनी निवडणूक अधिका-यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार निवडणूक अधिका-यांनी केलेल्या चौकशीत संचालक मंडळाने आचारसंहिता काळात हा ठराव केल्याचे निष्पन्न झाले आहे. परिणामी निवडणूक अधिका-यांच्या आदेशानुसार जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या उपाध्यक्षांसह बैठकीस उपस्थित असलेल्या २३ संचालकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment